1 00:00:01,252 --> 00:00:02,802 लाऊडरमिल्क मध्ये आतापर्यंत 2 00:00:03,295 --> 00:00:06,505 तुम्हाला वॉफल्स दोन तास तुमच्या महालात ठेवता आले नाहीत? 3 00:00:06,590 --> 00:00:08,130 फारसा बदलला नाही, बरं वाटलं. 4 00:00:08,217 --> 00:00:10,427 अजून अनोळखी लोकांशी विनाकारण झटापट करतोच. 5 00:00:10,511 --> 00:00:13,221 -तुम्ही लाकूडतोडे आहात का? -आम्ही संगीतकार आहोत मूर्खा. 6 00:00:13,305 --> 00:00:15,635 -तू मूर्ख आहेस. -तू ठार मूर्ख आहेस. 7 00:00:15,725 --> 00:00:16,885 मी माणूसघाणा आहे, 8 00:00:16,976 --> 00:00:19,556 मला त्यावर काम करावं लागेल कारण मला त्याचा त्रास होतो. 9 00:00:19,645 --> 00:00:22,015 मला तुझ्याशी आणि एकंदरीतच जगाशी 10 00:00:22,106 --> 00:00:24,396 जुळवून घेणं शिकावं लागेल. 11 00:00:24,483 --> 00:00:27,403 मी टीकाकार आहे, तेसुद्धा निष्कलंक ख्याती असलेला. 12 00:00:27,486 --> 00:00:30,066 मी प्रकाशित लेखक आहे. काय चेष्टा समजता का? 13 00:00:30,740 --> 00:00:33,410 मी कुणी तरी आहे. 14 00:00:33,492 --> 00:00:36,002 तू अनेक वर्षात काही लिहीलं नाहीस. 15 00:00:36,078 --> 00:00:38,328 -वाटलं असतं तर लिहीलं असतं. -मग लिही. 16 00:00:40,666 --> 00:00:42,206 मला वाटतं, तू महत्त्वाचं बोललीस. 17 00:00:49,592 --> 00:00:51,472 फेरफटक्यात सामील झाल्याबद्दल आभार, 18 00:00:51,552 --> 00:00:53,432 पण जरा हळू चल, 19 00:00:53,512 --> 00:00:56,142 या पेक्षा हळू चाललो तर जागीच उभा राहीन. 20 00:00:56,223 --> 00:00:58,023 मला घाम सुद्धा येत नाहीय. 21 00:00:58,100 --> 00:00:59,270 मला भरपूर येतोय. 22 00:00:59,351 --> 00:01:00,731 तुला वाचतानाही घाम येतो. 23 00:01:00,811 --> 00:01:03,901 हेर कथांच्या लाखो चाहत्यांना असाच घाम येत असतो. 24 00:01:03,981 --> 00:01:06,111 वर मला हायपरहायड्रोसिस, घामाचा आजार आहे. 25 00:01:06,192 --> 00:01:08,442 हायपर... काय? तुला असं काहीही नाहीय. 26 00:01:08,527 --> 00:01:10,607 -असं काहीही नसतं. -हे तुझं अज्ञान आहे. 27 00:01:10,696 --> 00:01:12,446 मी तुला सिद्ध करून दाखवेन. 28 00:01:13,616 --> 00:01:14,616 हे. 29 00:01:15,493 --> 00:01:17,293 ती द्योतक, रागीट पट्टीत नाचत असता... 30 00:01:17,369 --> 00:01:18,369 तू काय करतोयस? 31 00:01:19,455 --> 00:01:20,495 म्हणजे? 32 00:01:23,209 --> 00:01:26,339 मी कोड्यात बोललो असं मला वाटत नाही, पण तरी पुन्हा प्रयत्न करतो. 33 00:01:26,420 --> 00:01:27,630 तू काय करतोयस? 34 00:01:29,298 --> 00:01:30,628 स्वतःला व्यक्त करतोय. 35 00:01:30,716 --> 00:01:32,336 खडकावर? 36 00:01:32,426 --> 00:01:33,586 हो. 37 00:01:33,677 --> 00:01:36,177 हे पहा, मला ह्याचा... ग्राफिटीचा रागच आहे, 38 00:01:36,263 --> 00:01:39,483 पण ते किमान एखाद्या ओसाड इमारतीवर किंवा निकामी गाडीवर कर. 39 00:01:40,559 --> 00:01:42,649 तू काय सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आहेस? 40 00:01:43,270 --> 00:01:45,770 काय... तू नक्की काय लिहीलं आहेस? 41 00:01:45,856 --> 00:01:49,356 "ती द्योतक, रागीट पट्टीत" 42 00:01:49,443 --> 00:01:51,783 "नाचत असता." 43 00:01:52,363 --> 00:01:53,493 याचा अर्थ काय? 44 00:01:54,740 --> 00:01:57,580 "हायपरहायड्रोसिस" शोधत असताना इमेजवर क्लिक करू नका. 45 00:01:57,660 --> 00:01:59,700 एक मिनिट. खरंच सांग... याचा अर्थ काय? 46 00:02:00,287 --> 00:02:02,577 मला वाटतं हे अगदी स्वयंस्पष्ट आहे. 47 00:02:02,665 --> 00:02:06,085 हो. कुणा मुर्खाने तुला टांग मारली तरी 48 00:02:06,168 --> 00:02:08,668 तुला समजवता येणार नाही. 49 00:02:09,588 --> 00:02:10,758 टांग मारली तरी. 50 00:02:11,757 --> 00:02:14,927 म्हणजे, कदाचित हे समजण्याची तुझी बौद्धिक उंची नाहीय. 51 00:02:15,010 --> 00:02:17,720 मला प्रबुद्ध करा, कवी राज. 52 00:02:17,805 --> 00:02:19,095 ठीक आहे. 53 00:02:23,143 --> 00:02:25,563 असं आहे की हे एका... मुलीबद्दल आहे, 54 00:02:26,021 --> 00:02:29,611 आणि ती नाचते आहे, आणि ती रागात आहे. 55 00:02:29,692 --> 00:02:31,402 ती नाचते आहे, आणि ती रागात आहे. 56 00:02:31,485 --> 00:02:33,315 -समजलं, पुढे? -आणि माहीत आहे... 57 00:02:34,196 --> 00:02:35,196 ती... म्हणजे... 58 00:02:35,281 --> 00:02:36,621 ती एका पट्टीत आहे. 59 00:02:36,699 --> 00:02:38,909 ती पट्टी द्योतक आहे... आधुनिक काळात जो... 60 00:02:41,662 --> 00:02:43,332 आयला, काय बोलतोय, मलाच समजत नाहीय. 61 00:02:43,414 --> 00:02:45,754 मलाही तेच वाटलं होतं, कारण हे सर्व कचरा आहे. 62 00:02:45,833 --> 00:02:47,593 मी काय बोलतोय ते मला समजतंय. 63 00:02:47,668 --> 00:02:49,918 मला अशांची चांगली समज आहे ज्यांच्यात... 64 00:02:50,004 --> 00:02:52,804 तुला न दुखावता कसं बोलू? 65 00:02:52,882 --> 00:02:54,382 कलेचा लवलेशही नसतो. 66 00:02:58,220 --> 00:02:59,720 नाही, तू बरोबर बोलतोयस. 67 00:03:00,306 --> 00:03:02,676 मला वाटलं की मी कदाचित एक कवी आहे... 68 00:03:05,853 --> 00:03:06,983 बहुधा... 69 00:03:07,730 --> 00:03:09,230 माझे वडील म्हणायचे तेच खरं आहे. 70 00:03:11,692 --> 00:03:12,942 मी कुणीच नाहीय. 71 00:03:13,027 --> 00:03:14,317 आता कसं बरोबर बोललास. 72 00:03:19,283 --> 00:03:21,953 त्या मर्दाशी आपण जास्तीच कठोर बोललो, तुला असं नाही वाटत? 73 00:03:22,036 --> 00:03:23,116 कोण मर्द? 74 00:03:23,203 --> 00:03:26,043 -तो... तो गडी. -नाही. 75 00:03:26,498 --> 00:03:29,538 कलाकारांबद्दल एक गोष्ट सांगतो, त्यांची कातडी गेंड्याची असते. 76 00:03:41,639 --> 00:03:44,679 तर मी आणि लिझ सोलोमन असे समोरासमोर होतो, 77 00:03:44,767 --> 00:03:47,057 हायस्कूलमध्ये पाहिलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच. 78 00:03:47,144 --> 00:03:49,274 काय सांगू, ती आता जास्ती सुंदर दिसते. 79 00:03:49,355 --> 00:03:51,315 मी संपर्क साधला कारण ती कलाकार आहे 80 00:03:51,398 --> 00:03:53,778 आणि मला माझ्या मांजराचं चित्र काढून घ्यायचं होतं. 81 00:03:53,859 --> 00:03:56,609 एखाद्या बाईलाच मांजराचं चित्र काढून घ्यायला आवडेल. 82 00:03:56,695 --> 00:03:58,945 मला बाईचं चित्र काढून घ्यायला आवडेल. 83 00:03:59,657 --> 00:04:00,777 ठीक आहे, सांगतोच आता. 84 00:04:00,866 --> 00:04:05,196 मी काही फक्त माझ्या मांजराला श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्र काढून घेणार नव्हतो. 85 00:04:06,538 --> 00:04:09,078 मी ते पुन्हा लिझच्या संपर्कात येण्यासाठी केलं होतं. 86 00:04:09,166 --> 00:04:13,166 मी अनेक वर्षांपूर्वी "लिझ सोलोमनचा घटस्फोट" असा गुगल अलर्ट लावून ठेवला होता. 87 00:04:13,921 --> 00:04:16,421 शेवटी तो वाजलाच. गोड बातमी आली. 88 00:04:16,507 --> 00:04:19,047 माझा त्या मुलीवर इतका जीव होता. 89 00:04:19,134 --> 00:04:21,894 मला वाटतं, तिचाही माझ्यावर होता. 90 00:04:21,971 --> 00:04:24,851 पण काल रात्री जेव्हा मी माझं चित्र घ्यायला गेलो तेव्हा, 91 00:04:24,932 --> 00:04:27,772 तिला आमच्या इंग्लिशच्या वर्गातला खास विनोद आठवलाच नाही, 92 00:04:28,268 --> 00:04:31,518 आणि तिने माझं नाव पण चुकीचं घेतलं, आणि आडनावही. 93 00:04:31,605 --> 00:04:33,105 मग तुझी काय अपेक्षा होती? 94 00:04:33,190 --> 00:04:35,360 तू हायस्कूलला जायचा त्याला 50 वर्षं झाली. 95 00:04:35,442 --> 00:04:37,112 -चाळीस वर्षं. -तेच ते. 96 00:04:37,194 --> 00:04:39,204 हिमतीने घे मित्रा. 97 00:04:39,279 --> 00:04:41,159 एकतर्फी प्रेमाची उगाच बदनामी होते. 98 00:04:41,240 --> 00:04:42,240 ती कशी? 99 00:04:42,324 --> 00:04:44,204 कारण तेच एक प्रेम आहे ज्यात खरं तर 100 00:04:44,284 --> 00:04:45,624 तुमचा ह्रदय भंग होत नाही. 101 00:04:45,703 --> 00:04:48,083 तेच दुतर्फी प्रेम त्याला ओरबाडून काढतं. 102 00:04:48,998 --> 00:04:51,078 तू तिच्यासाठी इतका वेडा का झालास? 103 00:04:51,959 --> 00:04:53,209 मी वेडा झालो नाहीय. 104 00:04:53,293 --> 00:04:54,883 मग इतका उदास का दिसतोयस? 105 00:04:54,962 --> 00:04:56,882 मी उदास नाहीय. माझा चेहराच तसा आहे. 106 00:04:56,964 --> 00:04:59,304 माझा चेहरा तसा असता तर मीही रडलो असतो. 107 00:04:59,383 --> 00:05:00,473 खड्ड्यात जा. 108 00:05:07,433 --> 00:05:08,433 रॉज? 109 00:05:08,976 --> 00:05:10,096 रॉज? 110 00:05:11,937 --> 00:05:12,937 हे. 111 00:05:13,022 --> 00:05:15,192 -अरे,ऐकूच नाही आलं. -तुझ्याकडे एक मिनिट आहे? 112 00:05:16,108 --> 00:05:18,188 मला... मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. 113 00:05:18,777 --> 00:05:20,147 मी लाऊडरमिल्कला घेऊन येतो. 114 00:05:20,237 --> 00:05:22,237 नाही, नाही, नाही. 115 00:05:22,322 --> 00:05:24,032 मला हे गुपित त्याला सांगायचं नाहीय. 116 00:05:24,450 --> 00:05:27,750 पण तो आपला नेता आहे, आणि माझ्यापेक्षा तो तुझी जास्ती मदत करू शकेल. 117 00:05:27,828 --> 00:05:28,998 नाही, तुला कळत नाहीय. 118 00:05:29,079 --> 00:05:30,869 मी... मी आजवर हे कुणालाच बोललो नाहीय. 119 00:05:36,336 --> 00:05:37,336 काय झालंय? 120 00:05:38,088 --> 00:05:40,338 मी खूप लंब्याचवड्या गप्पा केल्या आहेत, 121 00:05:42,259 --> 00:05:44,139 पण खरं तर मी रेहानाबरोबर झोपलो नाहीय. 122 00:05:45,429 --> 00:05:47,139 ना क्रिस्टिनसोबत चाळे केले आहेत. 123 00:05:48,515 --> 00:05:49,885 तू मला निराश केलंस. 124 00:05:49,975 --> 00:05:52,845 मी अप्रत्यक्षपणे तुझ्या मार्फत जगत होतो. 125 00:05:52,936 --> 00:05:55,016 हो, मला माहीत आहे. मला माफ कर. 126 00:05:56,356 --> 00:05:59,776 मी त्या हायस्कूलमधल्या बाईला भेटून इतका उदास झालो कारण मला जाणवलं 127 00:05:59,860 --> 00:06:02,530 की आयुष्यात मी अजून तिथेच आहे. 128 00:06:02,613 --> 00:06:04,243 व्यावसायिकदृष्ट्या मी बाजी मारतोय. 129 00:06:04,323 --> 00:06:05,873 माझ्यात बाहुबलीचं पौरुष आहे. 130 00:06:05,949 --> 00:06:09,619 पण प्रेमाच्या बाबतीत मात्र शून्यच आहे. 131 00:06:11,413 --> 00:06:15,003 टोनी आणि सिस्को बोलले, ते खरं आहे. तू अजून कुंमार आहेस. 132 00:06:15,834 --> 00:06:17,464 वेड लागलंय का? हे हास्यास्पद आहे. 133 00:06:17,544 --> 00:06:19,514 मी कधी... 134 00:06:19,588 --> 00:06:20,838 वरचे वर काही केलं नाहीय. 135 00:06:22,049 --> 00:06:24,339 म्हणजे कधीच चोरटेपणाने... खोपच्यात... 136 00:06:24,426 --> 00:06:26,926 शी... मी त्यातला नाही बरं. 137 00:06:27,012 --> 00:06:28,432 मला वेगळंच सांगायचं आहे. 138 00:06:29,139 --> 00:06:30,429 सांगायचं हे आहे की... 139 00:06:34,478 --> 00:06:36,768 -मी कधी स्त्रीचं चुंबन घेतलं नाहीय. -काय, खरंच? 140 00:06:37,564 --> 00:06:41,114 पण चुंबन न घेता कुणा स्त्रीशी संभोग करणं कसं शक्य आहे? 141 00:06:42,569 --> 00:06:46,739 असं आहे की मी फक्त व्यावसायिक बायांसोबत संभोग केला आहे. 142 00:06:46,824 --> 00:06:48,334 व्यावसायिक म्हणजे समजलं ना... 143 00:06:48,408 --> 00:06:50,158 हो, हो, समजलं. 144 00:06:50,244 --> 00:06:53,004 तर, वेश्या तुम्हाला चुंबन घेऊ देत नाहीत. 145 00:06:53,080 --> 00:06:56,380 हं, मला वाटतं तू या बाबतीत लाऊडरमिल्कशी बोलावं. 146 00:06:56,458 --> 00:06:58,378 कदाचित तुझ्या नशाबाजीचं हे कारण असेल. 147 00:06:58,460 --> 00:07:00,630 नाही, तू हे कुणा कुणाला सांगायचं नाहीयस. 148 00:07:00,712 --> 00:07:03,342 रॉजर... हे फारच लाजीरवाणं आहे. 149 00:07:03,423 --> 00:07:05,183 मग तू हे मला का सांगतोयस? 150 00:07:05,759 --> 00:07:08,009 माहीत नाही. कुणाला तरी सांगणं गरजेचं होतं. 151 00:07:08,095 --> 00:07:09,595 मला तुझ्या सोबत सुरक्षित वाटतं, 152 00:07:09,680 --> 00:07:11,140 कारण तुला पूर्ण हात नाहीत. 153 00:07:12,432 --> 00:07:14,062 नाही, मला... तसं म्हणायचं नव्हतं. 154 00:07:14,143 --> 00:07:16,943 म्हणजे असं की, आपण दोघे एकसारखे आहोत, 155 00:07:17,020 --> 00:07:19,230 कारण देवाने दोघांवर खूप अन्याय केला आहे. 156 00:07:20,023 --> 00:07:21,363 नाही, फक्त तेही नाही. 157 00:07:21,441 --> 00:07:24,191 तू ग्रुपमधल्या इतरांहून बुद्धिमान, अधिक संवेदनशील आहेस, 158 00:07:24,278 --> 00:07:28,568 आणि तुझं उच्चारण सुंदर आहे. ऐक, तू प्लीज माझी मदत करशील? 159 00:07:28,657 --> 00:07:30,577 रॉजर, तू माझा जिवलग मित्र आहेस. 160 00:07:33,912 --> 00:07:35,462 मला माफ कर, मला जमणार नाही. 161 00:07:36,290 --> 00:07:38,420 ऐक, माझी आई आजारी आहे, गंभीर आजारी आहे, 162 00:07:39,001 --> 00:07:41,131 मला तिची काळजी घेण्यासाठी काही काळ 163 00:07:41,211 --> 00:07:42,421 इंग्लंडला जाणं भाग आहे. 164 00:07:42,504 --> 00:07:45,134 तुझ्यासाठी ते चांगलंच आहे. पण माझं काय? 165 00:07:47,593 --> 00:07:49,263 काळजी करू नकोस. 166 00:07:49,344 --> 00:07:50,764 तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील 167 00:07:54,433 --> 00:07:55,983 कमाल आहे, एका फालतू हेडबँडसाठी 168 00:07:56,059 --> 00:07:57,729 तू मला इतकी पायपीट करायला लावलीस? 169 00:07:57,811 --> 00:07:59,811 माझ्या पिकल बॉलकडून टीमकडून भेट मिळालाय. 170 00:07:59,897 --> 00:08:01,607 माझ्यासाठी खास होता. 171 00:08:01,690 --> 00:08:02,980 मी तुला नवीन घेऊन देतो. 172 00:08:03,066 --> 00:08:04,526 मला आठवतही नाही तू कधी हेड... 173 00:08:04,610 --> 00:08:05,990 पिकल बॉल काय प्रकार आहे? 174 00:08:06,403 --> 00:08:07,573 तुला पिकल बॉल ठाऊक नाही? 175 00:08:07,654 --> 00:08:09,574 ते टेनिस आणि बॅडमिंटनचं मिश्रण असतं. 176 00:08:09,656 --> 00:08:12,906 ते सहसा गवत, कुरण, माती किंवा वाळूत खेळलं जातं. 177 00:08:13,744 --> 00:08:15,004 तो वेडा आता काय करतोय? 178 00:08:15,078 --> 00:08:17,708 पाहिलं, इतकं कठोर बोललास, आता तो आत्महत्या करणार. 179 00:08:18,540 --> 00:08:20,170 तुला काही समजत नाही. 180 00:08:20,250 --> 00:08:21,960 चांगलं दृश्य पाहण्यासाठी गेला असेल. 181 00:08:22,044 --> 00:08:24,714 असं? मग खडकावर "आमुचा रामराम घ्यावा" असं का लिहीलं असतं? 182 00:08:24,796 --> 00:08:26,006 आमुचा रामराम घ्यावा 183 00:08:26,089 --> 00:08:28,049 -शी, मला काय ठाऊक. -काही तरी करायला हवं. 184 00:08:28,133 --> 00:08:29,383 ह्याला तू जबाबदार आहेस. 185 00:08:29,468 --> 00:08:30,718 माझा काय दोष? 186 00:08:30,802 --> 00:08:33,142 मी त्याला फार तर 30 सेकंद ओरडलो असेन. 187 00:08:33,222 --> 00:08:34,772 नक्कीच त्याचे आधीचे मुद्दे असणार 188 00:08:34,848 --> 00:08:37,228 नाहीतर खडकावर वेडंवाकडं लिहीलं नसतं. 189 00:08:37,935 --> 00:08:39,935 अरे मित्रा, तू हे काय करतोयस? 190 00:08:40,979 --> 00:08:44,019 मूर्खा, मी उडी मारून जीव देणार आहे, तुझ्यामुळे! 191 00:08:44,107 --> 00:08:46,687 आता कमीत कमी यासाठी तरी शुभेच्छा दे! 192 00:08:46,777 --> 00:08:49,067 आधी खाली ये. काही तरी मूर्खपणा करू नकोस. 193 00:08:49,154 --> 00:08:50,744 अच्छा, म्हणजे आता मी पण मूर्ख? 194 00:08:50,822 --> 00:08:53,582 नाही, मी म्हणालो की मूर्खपणा करू नकोस. 195 00:08:53,659 --> 00:08:57,249 ऐक, चूक माझी होती, ठीक आहे? 196 00:08:57,329 --> 00:09:00,709 ती... तुझी पट्टीदार कविता खरं तर... 197 00:09:00,791 --> 00:09:02,211 खरं तर... खूपच चांगली आहे. 198 00:09:02,292 --> 00:09:03,962 उगाच माझी खुशामत करू नकोस. 199 00:09:04,044 --> 00:09:06,964 नाही? ठीक आहे, कारण ती बकवासच होती. 200 00:09:07,047 --> 00:09:09,547 तू 'पट्टी' पण शुद्ध लिहीलं नव्हतंस. 201 00:09:09,633 --> 00:09:11,013 "द्योतक" बद्दल अपेक्षाच नको. 202 00:09:11,093 --> 00:09:13,053 मला वाटतं की ती फारच मस्त होती. 203 00:09:13,136 --> 00:09:15,346 तुला सुंदर लिखाणाची देणगी लाभली आहे. 204 00:09:15,430 --> 00:09:17,850 नाही, तुझा मित्र योग्यच बोलतोय. 205 00:09:17,933 --> 00:09:19,313 ती कविता एक विनोद आहे. 206 00:09:20,227 --> 00:09:22,477 मी स्वतः एक विनोद आहे. 207 00:09:22,562 --> 00:09:25,192 मी योग्य पद्धतीने स्वतःचा जीवही घेऊ शकत नाहीय. 208 00:09:25,274 --> 00:09:28,784 मी सकाळपासून इथे घुटमळतोय कारण माझ्यात उडी मारण्याची हिंमत नाहीय. 209 00:09:28,860 --> 00:09:30,320 चूक, तुझ्यात ती आहे. 210 00:09:30,404 --> 00:09:32,864 म्हणजे... तुझ्यात खूप हिंम्मत आहे... आणि 211 00:09:32,948 --> 00:09:34,448 त्या हिंमतीच्या जोरावर, 212 00:09:34,533 --> 00:09:36,333 तू खूप मोठी कामं करून दाखवणार आहेस. 213 00:09:36,410 --> 00:09:37,740 पण तू हे करू नकोस. 214 00:09:37,828 --> 00:09:39,248 -कारण? -कारण काय? 215 00:09:39,329 --> 00:09:40,369 अनेक आहेत. 216 00:09:40,455 --> 00:09:42,495 म्हणजे पहा की, तू बारीक आहेस. 217 00:09:42,582 --> 00:09:44,422 मला तुझ्यासारखी देहयष्टी हवी होती! 218 00:09:44,501 --> 00:09:45,921 चल, हे एक कारण झालं. 219 00:09:46,003 --> 00:09:48,013 आणि तुला हायपरहायड्रोसिस नाहीय. 220 00:09:48,088 --> 00:09:50,508 नक्कीच. नाही तर तू असा उन्हात उभा राहू शकला नसतास. 221 00:09:50,590 --> 00:09:52,840 तू काकडीसारखा थंड दिसतोयस. मला हेवा वाटतो. 222 00:09:52,926 --> 00:09:54,796 मित्रा, मला तुझी पूर्ण कथा ठाऊक नाही, 223 00:09:54,886 --> 00:09:58,096 पण सगळ्यांना कठीण परिस्थितीतून जावं लागतं. 224 00:09:58,181 --> 00:10:00,681 वाटतं की आयुष्यात आता काही होऊ शकत नाही. 225 00:10:00,767 --> 00:10:03,227 पण ते तसं नसतं. चूक आहे. 226 00:10:03,562 --> 00:10:06,152 झालं तुमचं? मी उडी मारतोय. 227 00:10:06,231 --> 00:10:08,151 -नाही! नाही! -नाही, नको. 228 00:10:08,233 --> 00:10:09,323 फक्त प्रस्तावना होती. 229 00:10:09,401 --> 00:10:11,701 फक्त तुझं काही बरं वाईट होण्याचा प्रश्न नाहीय. 230 00:10:11,778 --> 00:10:14,028 ज्यांना तुझी काळजी आहे, त्यांचा विचार कर. 231 00:10:14,114 --> 00:10:15,664 दुसरी घंटा! 232 00:10:15,741 --> 00:10:17,491 कुणी माझी काळजी करत नाही. 233 00:10:17,576 --> 00:10:19,366 मला रेस्टॉरंट, इतकंच काय 234 00:10:20,454 --> 00:10:22,714 सिनेमाला पण एकट्यानेच जावं लागतं. 235 00:10:24,166 --> 00:10:26,456 ठीक आहे. हाच मुद्दा असेल तर 236 00:10:26,543 --> 00:10:28,883 खाली उतर. मी तुझ्याबरोबर सिनेमाला येईन. 237 00:10:33,842 --> 00:10:35,222 कोणता? 238 00:10:35,302 --> 00:10:36,762 तू ठरव. 239 00:10:36,845 --> 00:10:38,885 कॉमिक-बुकवर आधारित बकवास सोडून कुठलाही. 240 00:10:40,682 --> 00:10:41,682 कधी? 241 00:10:42,559 --> 00:10:43,849 गुरुवारी? 242 00:10:47,606 --> 00:10:50,936 मला माझ्या कार्यक्रमात थोडा फेरबदल करावा लागेल... 243 00:10:51,026 --> 00:10:53,736 -पण ठीक आहे, जाऊ या. -मस्त! 244 00:10:53,820 --> 00:10:55,360 -सुपर. -हं! 245 00:10:55,447 --> 00:10:56,737 तू जगणार आहेस! 246 00:10:59,034 --> 00:11:00,744 मला खाली येण्यासाठी थोडी मदत मिळेल? 247 00:11:07,501 --> 00:11:11,381 जर तुम्ही पिऊन केलेल्या कार अपघातात पत्नी मरता मरता वाचली असेल, पुढे वाचा... 248 00:11:11,463 --> 00:11:14,513 तर मी त्या गाण्यांच्या संग्रहाला दोष देईन 249 00:11:51,920 --> 00:11:53,170 तुम्ही लोक इथे काय करताय? 250 00:11:53,255 --> 00:11:54,915 आम्हाला तुझी स्त्री-समस्या समजली. 251 00:11:55,006 --> 00:11:56,466 त्याने तुम्हाला सांगितलं? 252 00:11:56,550 --> 00:11:58,140 आम्हाला तुझी खरंच मदत करायची आहे. 253 00:11:58,552 --> 00:12:00,972 ठीक आहे, पण आणखी कुणाला सांगू नका. ठीक? 254 00:12:01,054 --> 00:12:02,934 हे फक्त... आपल्या टोळीतच राहील. 255 00:12:03,014 --> 00:12:04,024 -ठीक आहे. -ठीक आहे. 256 00:12:04,099 --> 00:12:05,309 लाजू नकोस, नवा इसम. 257 00:12:05,392 --> 00:12:07,892 हे पहा, तू तुझ्या व्यवसायात कसा तरी यशस्वी झालास. 258 00:12:07,978 --> 00:12:09,648 पण प्रेम करायला वेळ मिळाला नाही. 259 00:12:09,729 --> 00:12:11,439 बरोबर आहे, याच्यावर विचार करू या. 260 00:12:14,484 --> 00:12:16,454 हा चोंबडा इथे काय करतोय? 261 00:12:16,528 --> 00:12:19,108 तो आमचं क्लाऊडशी झालेलं बोलणं चोरून ऐकत होता. 262 00:12:19,197 --> 00:12:21,277 पंधरा फुटांचा नियम आहे. 263 00:12:21,616 --> 00:12:22,946 जर तुम्ही कुजबुजत नसाल तर 264 00:12:23,034 --> 00:12:26,334 15 फुट परिसरातील कुणीही ते न ऐकणं, हे असभ्यपणाचं लक्षण आहे. 265 00:12:27,164 --> 00:12:28,544 मला खूप उशीर झाला का? 266 00:12:28,623 --> 00:12:30,333 हे फारच हास्यास्पद आहे. 267 00:12:30,417 --> 00:12:31,707 हास्यास्पद काय आहे? 268 00:12:31,793 --> 00:12:34,053 मदत न घेता फाजील गुप्तता पाळणं हास्यास्पद आहे. 269 00:12:34,129 --> 00:12:36,299 हे चुबन-बंदी बाबत तुझ्या मदतीला आले आहेत. 270 00:12:36,381 --> 00:12:37,631 पण मला याची मदत नको आहे. 271 00:12:37,716 --> 00:12:40,546 तर तुला मदत नको आहे. 272 00:12:40,635 --> 00:12:43,095 मग मी ज्या सुंदरी सोबत तुझी जोडी जमवली होती, 273 00:12:43,180 --> 00:12:45,520 तिला फोन करून न येण्याबद्दल कळवतो. 274 00:12:45,599 --> 00:12:48,689 तू माझी जोडी जमवली? का? 275 00:12:48,768 --> 00:12:50,438 धार्मिक नसूनही माझा विश्वास आहे की 276 00:12:50,520 --> 00:12:53,020 फटाकडी बाई एका पुरुषाचा आत्मा वाचवू शकते. 277 00:12:53,482 --> 00:12:55,782 शिवाय मी प्रयत्नपूर्वक कुणाला तरी सहमतीने 278 00:12:55,859 --> 00:12:57,819 तुझं चुंबन घ्यायला भाग पाडलं तर कदाचित 279 00:12:57,903 --> 00:13:01,033 तू तुझा शेंबडेपणा थोडा तरी कमी करशील. 280 00:13:01,114 --> 00:13:02,534 ठीक. मला माफ कर मग्सी. 281 00:13:02,616 --> 00:13:04,026 तू खरंच मोठं काम केलं आहेस. 282 00:13:04,117 --> 00:13:05,787 आणि ती मस्त बाई आहे. 283 00:13:05,869 --> 00:13:07,409 तुम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. 284 00:13:07,496 --> 00:13:09,286 एकच फरक हा आहे की ती सुंदर आहे. 285 00:13:09,372 --> 00:13:10,832 बाप रे, ती लवकर आली. 286 00:13:10,916 --> 00:13:13,496 आली पण? ती येण्यात आहे हे सांगितलं का नाहीस? 287 00:13:13,585 --> 00:13:15,085 कारण तुला तणाव आला असता. 288 00:13:15,170 --> 00:13:16,590 मला आता तणाव आला आहे. 289 00:13:16,671 --> 00:13:17,921 मी... मी कसा दिसतोय? 290 00:13:18,006 --> 00:13:19,086 उत्तर आवडणार नाही. 291 00:13:19,174 --> 00:13:20,684 बघ, आत्मविश्वास दिसला पाहिजे. 292 00:13:21,510 --> 00:13:22,510 -हे. -हे. 293 00:13:24,137 --> 00:13:25,137 तू काय करतोयस? 294 00:13:25,222 --> 00:13:27,522 पहिल्याच बॉलला सिक्स मारायला जाशील तर आऊट होशील. 295 00:13:27,599 --> 00:13:29,099 दे ती इकडे! 296 00:13:29,184 --> 00:13:30,234 ठीक आहे. 297 00:13:30,310 --> 00:13:32,600 कृपया थोडा एकांत द्या. 298 00:13:32,687 --> 00:13:34,307 मागील दारी... परसाकडे! 299 00:13:43,490 --> 00:13:44,660 हाय. 300 00:13:46,493 --> 00:13:47,663 हॅलो. 301 00:13:49,246 --> 00:13:50,246 मी लवकर आले का? 302 00:13:50,330 --> 00:13:52,040 नाही, नाही. 303 00:13:52,123 --> 00:13:53,463 तुम्हाला कसं सांगू? 304 00:13:53,542 --> 00:13:55,132 माझं एक मांजर बाहेर गेलंय. 305 00:13:55,210 --> 00:13:56,630 तू फक्त एक सेकंद थांबशील का? 306 00:13:56,711 --> 00:13:57,711 मी काही मदत करू? 307 00:13:57,796 --> 00:13:59,336 नाही, नाही, नाही, धन्यवाद. 308 00:13:59,422 --> 00:14:01,342 तुम्ही फारच गोड आहात पण 309 00:14:01,424 --> 00:14:02,514 थोडा वेळ इथेच थांबाल? 310 00:14:02,592 --> 00:14:06,142 जर माझ्या मांजराने घंटी वाजवली तर... म्हणजे, घराची घंटी... 311 00:14:12,519 --> 00:14:13,939 हा काय वेडपटपणा आहे? 312 00:14:14,020 --> 00:14:16,150 इतका नाराज का झाला आहेस? 313 00:14:16,231 --> 00:14:17,611 ती बुटुक बैंगण आहे. 314 00:14:17,691 --> 00:14:20,611 "लहान व्यक्ती" हा योग्य शब्दप्रयोग आहे. वंश-विद्वेषाने. 315 00:14:20,694 --> 00:14:23,114 तो तसं म्हणू शकतो कारण तो स्वतः खुजाच आहे. 316 00:14:23,196 --> 00:14:26,236 जसं तुम्ही लोक एकमेकांना... 317 00:14:26,908 --> 00:14:28,028 भाऊ म्हणू शकता. 318 00:14:28,118 --> 00:14:29,948 मित्रांनो, मी लहान व्यक्ती नाहीय. 319 00:14:30,036 --> 00:14:31,616 काय? तू कशाबद्दल बोलतोयस? 320 00:14:31,705 --> 00:14:34,205 मी हे म्हणतोय की मी लहान व्यक्ती नाहीय. 321 00:14:34,708 --> 00:14:37,628 तू मला सांगतोयस की तू लहान व्यक्ती नाहीस? 322 00:14:37,711 --> 00:14:38,711 नाही! 323 00:14:38,795 --> 00:14:39,875 ठीक आहे, जाऊ दे. 324 00:14:39,963 --> 00:14:41,633 मला त्याचे उंचीचे निकष ठाऊक नाहीत. 325 00:14:42,966 --> 00:14:45,296 अंडरवियरमध्ये माझ्या पूलमध्ये काय करतोयस? 326 00:14:45,385 --> 00:14:47,595 घाम येत होता, अन तू आपलंच घर समजा, म्हणाला 327 00:14:47,679 --> 00:14:50,719 मी असं काहीही म्हणालो नव्हतो. 328 00:14:50,807 --> 00:14:52,477 बाप रे, मी त्या मुलीला काय सांगू? 329 00:14:52,559 --> 00:14:54,479 -की बाहेरगावी गेलास? -तिने मला पाहिलंय. 330 00:14:54,561 --> 00:14:56,021 मग तू बाहेरगावी चाललास, सांग. 331 00:14:56,104 --> 00:14:57,984 मी रद्द करू शकत नाही. 332 00:14:58,064 --> 00:15:01,234 तिच्या लक्षात येईल की तिच्या उंची मुळे असं केलं. त्यामुळे... 333 00:15:01,318 --> 00:15:02,818 अंतिम क्षणी तुमच्या दिसण्यामुळे 334 00:15:02,902 --> 00:15:05,242 नाकारले गेल्यावर कसं वाटतं, माहीत आहे मला. 335 00:15:05,322 --> 00:15:06,742 मी सांगतो ते कर. 336 00:15:06,823 --> 00:15:09,123 डेटवर जा, अन बाहेर गेल्यावर भांडण उकरून काढ. 337 00:15:09,200 --> 00:15:10,950 तिला पुन्हा भेटायची गरज पडणार नाही, 338 00:15:11,036 --> 00:15:13,366 तू उंची-द्वेषी आहेस, हे तिला कळणार नाही. 339 00:15:14,122 --> 00:15:15,922 सभ्य माणसाप्रमाणे भांडण उकरून काढणे. 340 00:15:15,999 --> 00:15:17,879 हे कामी येऊ शकतं. धन्यवाद. 341 00:15:17,959 --> 00:15:22,049 वंडर-चॉपर, पाते असे तीक्ष्ण की आश्चर्य कराल की ते काय काय कापतं. 342 00:15:22,130 --> 00:15:25,720 लसूण, टोमॅटो, गाजर, बटाटे. जर तुम्ही खात असाल तर... 343 00:15:25,800 --> 00:15:27,550 तुम्ही हा सगळा कचरा कसं पाहू शकता? 344 00:15:27,636 --> 00:15:28,926 ती जाहिरात आहे. 345 00:15:29,012 --> 00:15:30,812 काय पाहताय, तुम्हाला हेपण समजत नाही. 346 00:15:30,889 --> 00:15:33,099 गरजही नाही. टीव्ही वरचं सगळंच बेकार असतं. 347 00:15:33,183 --> 00:15:35,813 खरं? मग 'सर्व्हायवर'चं काय? 348 00:15:35,894 --> 00:15:38,404 आणि बडी 'एन' अँडी? तू योग्य कपडे का घातले नाहीयत? 349 00:15:38,480 --> 00:15:40,520 -काय बोलतोयस? -तू स्वेटपँट्स घातल्या आहेत. 350 00:15:40,607 --> 00:15:42,357 ड्रेसकोड ठरलाय हे माहीत नव्हतं. 351 00:15:42,651 --> 00:15:43,861 नाही, आज गुरुवार आहे. 352 00:15:43,943 --> 00:15:45,323 हो. 353 00:15:45,403 --> 00:15:47,743 तू त्या आत्महत्यावाल्याला आजचं वचन दिलं होतं, 354 00:15:47,822 --> 00:15:49,202 डिनर आणि सिनेमाला नेण्याचं. 355 00:15:49,282 --> 00:15:51,622 तो खडकावरचा माणूस? 356 00:15:51,701 --> 00:15:54,411 त्या वेळेस योग्य वाटलं ते बोललो. मी त्याला बांधील नाहीय. 357 00:15:54,496 --> 00:15:55,616 आहेसच मुळी. 358 00:15:55,705 --> 00:15:57,495 शिवाय, तो खरंच चांगला वाटला. 359 00:15:57,582 --> 00:15:58,962 तू त्याच्याशी कधी बोललीस? 360 00:15:59,042 --> 00:16:01,042 बेनने बेत पक्का करायला फोन केला तेव्हा. 361 00:16:01,127 --> 00:16:02,247 त्याचा नंबर कसा मिळाला? 362 00:16:02,337 --> 00:16:04,877 आम्ही नंबर अदला-बदली केले. 363 00:16:04,964 --> 00:16:08,304 तुम्ही आत्महत्येच्या प्रयत्नानंतर हेच करता. साधी गोष्ट आहे. 364 00:16:08,927 --> 00:16:10,677 ठीक आहे, मग तू त्याच्याबरोबर जा. 365 00:16:10,762 --> 00:16:13,182 नाही, आत्महत्यावाला तुझा मित्र आहे, माझा नाही. 366 00:16:13,264 --> 00:16:15,104 त्याला स्पीड डायलवर टाकणारा तूच आहेस. 367 00:16:15,183 --> 00:16:17,143 हे पहा, हा इसम मनोरुग्ण असू शकतो. 368 00:16:17,227 --> 00:16:18,727 मला एकट्याने जायचं नाहीय. 369 00:16:18,812 --> 00:16:20,152 ठीक आहे तर मग. 370 00:16:20,230 --> 00:16:22,110 मी तुझ्यासोबत येतो. 371 00:16:22,190 --> 00:16:23,230 आता तर ठीक आहे? 372 00:16:24,025 --> 00:16:25,485 हे छान रेस्टॉरंट आहे. 373 00:16:25,568 --> 00:16:27,198 -धन्यवाद. -त्यात काही विशेष नाही. 374 00:16:27,278 --> 00:16:29,568 -तर तू कुणाला मत दिलंस? -काय? 375 00:16:29,656 --> 00:16:31,826 तुला पण माझ्याप्रमाणे ट्रंप आवडतो? 376 00:16:31,908 --> 00:16:33,988 तो जे बोलतो ते करून दाखवतो. 377 00:16:34,911 --> 00:16:36,791 बहुधा. 378 00:16:38,164 --> 00:16:40,544 मला त्याने कॅनडाच्या सीमेवर भिंत बांधलेली आवडेल. 379 00:16:40,625 --> 00:16:42,625 बरेच कॅनेडियन बलात्कारी आहेत, माहीत आहे? 380 00:16:43,503 --> 00:16:44,673 तू चेष्टा करतोयस ना? 381 00:16:44,754 --> 00:16:46,014 नाही, मला खरंच असं वाटतं. 382 00:16:46,089 --> 00:16:48,219 मला कॅनेडियन खूप खूप घाणेरडे वाटतात. 383 00:16:49,509 --> 00:16:52,179 शिक्षकांना बंदुका देण्याबद्दल तुझं काय मत आहे? 384 00:16:52,846 --> 00:16:53,846 मूर्खपणा आहे. 385 00:16:53,930 --> 00:16:55,350 मूर्खपणा? 386 00:16:55,432 --> 00:16:57,522 शहामृगी पवित्रा म्हणायचं, आणखी काय? 387 00:16:57,600 --> 00:17:01,980 हवामान बदलावर ज्या वायफळ चर्चा चालल्या आहेत, त्याबद्दल तुला काय बाटतं? 388 00:17:02,522 --> 00:17:03,862 तू हे सगळं मला का विचारतोयस? 389 00:17:04,190 --> 00:17:06,820 तुम्ही प्रश्न विचारून व्यक्तीला ओळखू शकता. 390 00:17:07,944 --> 00:17:11,074 आणि तू याच टेबलचा आग्रह का धरलास? 391 00:17:11,448 --> 00:17:13,988 त्याने काय ऑर्डर केलंय ते आता आपल्याला वासावरून समजेल 392 00:17:14,784 --> 00:17:17,454 मी या डेटवर फारच वेंधळेपणा करतोय ना? 393 00:17:17,537 --> 00:17:18,657 तुला पुन्हा माझ्याशी 394 00:17:18,747 --> 00:17:20,537 भेटायचं नसेल तर मी ते समजू शकतो. 395 00:17:22,250 --> 00:17:23,880 तुलाही असं वाटतं का की समलिंगी लोक 396 00:17:23,960 --> 00:17:25,380 गर्विष्ठ होत चालले आहेत? 397 00:17:25,462 --> 00:17:27,462 तुला ही डेट रद्द करायची असेल तर तसं सांग. 398 00:17:27,547 --> 00:17:29,507 तुला हे असं ढोंग करण्याची गरज नाहीय. 399 00:17:29,591 --> 00:17:31,431 -हे ढोंग नाहीय. -तू मला बावळट समजतोस? 400 00:17:31,509 --> 00:17:33,089 निघायचं असल्यास माझी हरकत नाही. 401 00:17:33,178 --> 00:17:35,218 मी घरी माझ्या मांजराला कुशीत घेऊन आरामात 402 00:17:35,305 --> 00:17:36,885 पेंग्विन गेम पाहत बसेन. 403 00:17:37,807 --> 00:17:39,477 तुला पिट्सबर्ग पेंग्विन आवडतात? 404 00:17:39,559 --> 00:17:41,559 -प्रचंड. -ती तर माझी पण टीम आहे. 405 00:17:41,644 --> 00:17:43,354 -छानच की. -नाही, तुला समजलं नाही. 406 00:17:43,438 --> 00:17:45,478 -मी त्यांच्यामागे वेडा आहे. -आहेसच मुळी. 407 00:17:45,565 --> 00:17:48,485 ते पुन्हा जिंकायला लागल्यापासून सगळे त्यांच्यावर फिदा होतायत. 408 00:17:48,568 --> 00:17:50,648 माझा जन्म पिट्सबर्गचा. मी खरी चाहती आहे. 409 00:17:50,737 --> 00:17:54,487 मीसुद्धा. ते अगदी टाकाऊ होते तेव्हापासून. 410 00:17:54,574 --> 00:17:56,334 त्यांचा लोगो व नाव इतकं वेडगळ होतं, 411 00:17:56,409 --> 00:17:58,619 शोकांतिका असलेली कुठलीही टीम मला आवडते. 412 00:17:59,496 --> 00:18:00,616 तुला काय म्हणायचंय? 413 00:18:00,705 --> 00:18:03,415 त्यांचा पहिला खेळाडू, मिशेल ब्रेयार. 414 00:18:03,500 --> 00:18:04,920 तो पदार्पणातच भन्नाट खेळला, 415 00:18:05,001 --> 00:18:07,841 आणि मोसम संपल्या संपल्या कार अपघातात मरण पावला. 416 00:18:07,921 --> 00:18:10,381 त्याने त्या वर्षी प्लेऑफ ओव्हरटाईम गोलही मारला. 417 00:18:12,842 --> 00:18:14,892 प्लीज, प्लीज, खाली बस. 418 00:18:19,224 --> 00:18:21,274 माफ कर सख्या, पण आता वेळ निघून गेलीय. 419 00:18:22,101 --> 00:18:23,811 माझा उत्साह आता ओसरला आहे. 420 00:18:24,437 --> 00:18:25,647 मला माफ कर. 421 00:18:25,730 --> 00:18:26,860 मी दिलगीर आहे, लुईस. 422 00:18:26,940 --> 00:18:28,820 मला ठाऊक आहे, मी मूर्खपणा केला आहे. 423 00:18:29,526 --> 00:18:31,436 मी पहिल्या भेटीत खूप घाबरून जातो, 424 00:18:31,528 --> 00:18:32,898 दुसऱ्या आणि तिसऱ्या भेटीतही. 425 00:18:32,987 --> 00:18:36,197 प्लीज, आपण या डेटला पुन्हा सुरुवात करूया का? 426 00:18:37,325 --> 00:18:38,365 प्लीज. 427 00:18:40,954 --> 00:18:42,914 ठीक आहे. काय हरकत आहे? 428 00:18:43,122 --> 00:18:44,462 मी तुझा खूप खूप आभारी आहे. 429 00:18:44,541 --> 00:18:46,041 मी काय करणार आहे, ठाऊक आहे? 430 00:18:46,125 --> 00:18:47,455 मी प्रमुख वेटरकडे जाऊन 431 00:18:47,544 --> 00:18:48,924 खातरजमा करतो की आपलं टेबल 432 00:18:49,003 --> 00:18:50,213 टॉयलेटच्या जवळ नसेल. 433 00:18:50,797 --> 00:18:52,587 जगात अजून स्त्रीदाक्षिण्य आहे! 434 00:18:54,884 --> 00:18:57,054 -तू म्हणाला होतास, मी निवडू शकतो. -हो पण... 435 00:18:57,136 --> 00:18:59,556 कुणालाही 'थ्री बिलबोर्ड्स'चा सीक्वल पहायचा नाहीय. 436 00:18:59,973 --> 00:19:02,183 काय? तो क्लासिक आहे. 437 00:19:02,267 --> 00:19:04,727 ठीक आहे तर, 438 00:19:04,811 --> 00:19:06,731 त्या शाश्वत क्लासिक मध्ये सॅम रॉकवेलचं 439 00:19:06,813 --> 00:19:08,863 पात्र एका व्यक्तीला भरदिवसा खिडकीतून 440 00:19:08,940 --> 00:19:10,650 बाहेर फेकतं आणि मरेस्तोवर मारतं 441 00:19:10,733 --> 00:19:12,283 तरीही तुरूंगात जात नाही? 442 00:19:12,360 --> 00:19:13,990 आणि पोलीस स्टेशनला आग लागते तेव्हा 443 00:19:14,070 --> 00:19:16,530 तो आगीपासून वाचत पळण्याऐवजी आगीतून पळत का जातो? 444 00:19:16,614 --> 00:19:19,374 पोलीस पीटर डिंक्लेने फ्रॅन मॅक्डोर्मंडच्या बाजूने 445 00:19:19,450 --> 00:19:21,870 दिलेल्या तोंडी साक्षीवर विश्वास का ठेवतात? 446 00:19:21,953 --> 00:19:23,663 ती गिफ्ट शॉपमध्ये काम करत असली तरी 447 00:19:23,746 --> 00:19:25,456 तिचे कपडे माकडाला शोभेलसे का आहेत? 448 00:19:25,540 --> 00:19:26,960 खलनायक इडाहोमध्ये राहत असताना 449 00:19:27,041 --> 00:19:29,001 तो विरंगुळ्यासाठी मिसूरीमध्ये का येतो? 450 00:19:29,085 --> 00:19:30,875 वुडीच्या बायकोबद्दल तर बोलायलाच नको. 451 00:19:31,504 --> 00:19:33,174 तू ग्राफिटीच नाही तर चित्रपटाबाबतीत 452 00:19:34,507 --> 00:19:35,837 ही अहंमन्य आहेस. 453 00:19:36,467 --> 00:19:37,587 मी अष्टपैलू आहे. 454 00:19:40,096 --> 00:19:42,136 तू पेंग्विनच्या एव्गिनी मॉल्किनची पण 455 00:19:42,223 --> 00:19:43,813 इतकी चाहती आहेस? 456 00:19:43,892 --> 00:19:45,982 -तो तर कमालच आहे. -हो, पण तुला माहीत आहे? 457 00:19:46,060 --> 00:19:48,400 बाकी सर्व क्रॉस्बी आणि लेम्यूला मानतात. 458 00:19:48,479 --> 00:19:50,939 जीनोकडे शैली आणि शांत विनोदबुद्धी आहे. 459 00:19:51,024 --> 00:19:53,444 बरोबर. तो खेळकर असूनही त्रयस्थ असतो. 460 00:19:54,527 --> 00:19:56,777 हे माझं घर. 461 00:19:56,988 --> 00:19:59,488 आज रात्री मला खूपच मजा आली. 462 00:20:00,533 --> 00:20:01,663 मलाही. 463 00:20:07,332 --> 00:20:08,502 शुभ रात्री. 464 00:20:10,877 --> 00:20:12,047 हो. 465 00:20:19,719 --> 00:20:20,849 ब्रेयार प्लेस 466 00:20:21,387 --> 00:20:22,637 शी! 467 00:20:22,722 --> 00:20:24,472 आणि मग जेव्हा फ्रांसेस मॅक्डोर्मंड 468 00:20:24,557 --> 00:20:27,017 रॅबायला मुलांचं लैंगिक शोषण करणारा म्हणते. 469 00:20:27,101 --> 00:20:29,441 तुम्हाला ते आवडलं? 470 00:20:29,520 --> 00:20:32,860 समीक्षक सुरु झाले. रॉबी रॉटन टोमॅटोजला काही तरी आवडलेलं नाहीय. 471 00:20:32,941 --> 00:20:35,361 रॉबी रॉटन टोमॅटोज. म्हणजे तू. 472 00:20:35,443 --> 00:20:38,953 कथेतील अनेक दोषांकडे दुर्लक्ष केलं तर काय, चित्रपट जबरदस्त होता. 473 00:20:39,030 --> 00:20:41,570 तू एक नंबरचा मूर्ख आहेस, ठाऊक आहे? 474 00:20:42,241 --> 00:20:43,791 हो. ठाऊक आहे. 475 00:20:44,285 --> 00:20:47,745 तुला कल्पना आहे की काहीही निर्माण करणं किती अवघड असतं? 476 00:20:47,830 --> 00:20:50,500 चित्रपट, गाणं, खडकावरची कविता? 477 00:20:51,084 --> 00:20:53,004 पैज लाव, तू काहीही निर्माण केलं नाहीयस. 478 00:20:53,086 --> 00:20:56,166 हा अन्याय होईल. खरं तर, लाऊडरमिल्कने एक पुस्तक लिहिलंय. 479 00:20:58,007 --> 00:20:59,127 काय, कादंबरी? 480 00:20:59,217 --> 00:21:00,637 नाही, तो संगीत समीक्षक होता. 481 00:21:00,718 --> 00:21:02,848 आजवरच्या टुकार गाण्यांवर पुस्तक लिहिलंय. 482 00:21:03,805 --> 00:21:05,715 अच्छा. 483 00:21:05,807 --> 00:21:08,687 आता सर्व उलगडा होतोय. तू समीक्षक आहेस. 484 00:21:09,435 --> 00:21:12,975 प्रत्येक समीक्षक हा अयशस्वी काही तरी होता. 485 00:21:13,064 --> 00:21:14,984 सगळं टुकार आहे हे जितक्या जोरात बोलता 486 00:21:15,066 --> 00:21:16,476 तितकं स्वतःचं अपयश झाकता. 487 00:21:16,567 --> 00:21:18,737 तुला समजत नाही... जा, खडकावर कलाकारी दाखव. 488 00:21:18,820 --> 00:21:21,280 थांब. तू म्हणालास की हा समीक्षक 'होता'. 489 00:21:21,364 --> 00:21:23,534 तू आता काय करतोस? टॉयलेट साफ करतोस? 490 00:21:23,616 --> 00:21:25,326 नाही, मी टॉयलेट साफ करत नाही. 491 00:21:25,410 --> 00:21:27,620 तो बँकेची फरशी साफ करतो. 492 00:21:33,584 --> 00:21:34,794 फारच दयनीय आहे. 493 00:21:35,753 --> 00:21:37,513 तू माझ्यापेक्षा कामातून गेलेला आहेस? 494 00:21:41,968 --> 00:21:44,138 फ़्रांसेस मॅक्डॉर्मंडचे आणखी कुठले सिनेमे? 495 00:21:49,767 --> 00:21:52,227 -हा आला पहा. -ओह. 496 00:21:52,311 --> 00:21:54,231 काय झालं? चुंबन-बंदी उठली? 497 00:21:54,939 --> 00:21:56,019 साधारणपणे. 498 00:21:56,107 --> 00:21:58,737 'साधारणपणे' काय असतं? एक तर 'हो', किंवा 'नाही' म्हण. 499 00:21:59,986 --> 00:22:02,446 काल मी माझी सर्वात मस्त डेट अनुभवली. 500 00:22:02,530 --> 00:22:04,450 ती स्त्री कमाल आहे. 501 00:22:04,532 --> 00:22:06,412 तिला मांजर आणि हॉकी आवडतात. 502 00:22:07,243 --> 00:22:10,333 मी तिचे चुंबन घेणारच होतो, आणि मी... मी हे असं केलं. 503 00:22:12,331 --> 00:22:13,331 काय रे देवा. 504 00:22:14,042 --> 00:22:15,792 तू हे केलं? तिच्याशी? 505 00:22:15,877 --> 00:22:19,207 ठाऊक आहे की मी पुळचटपणा केला. तिचीही इच्छा मी चुंबन घ्यावं अशी होती. 506 00:22:19,297 --> 00:22:22,087 हे तर शिऱ्याच्या वाटीसह हात मिळवणं झालं. 507 00:22:23,051 --> 00:22:26,011 तुझ्या हाताचं प्लॅस्टर आताच निघालंय, पण म्हणून काय झालं? 508 00:22:26,095 --> 00:22:28,135 नाही, नाही, माझ्या हातात पूर्ण बळ आलंय. 509 00:22:28,222 --> 00:22:29,772 घे, हात मिळवून पहा. 510 00:22:35,521 --> 00:22:38,361 हे दुधात बुडवलेल्या पावाच्या लगद्यासारखं वाटतंय. 511 00:22:38,441 --> 00:22:39,781 हे जरा बरं आहे. 512 00:22:39,859 --> 00:22:42,989 माझं हात मिळवणं बावळटासारखं आहे, हे कुणीच आधी कसं नाही सांगितलं? 513 00:22:43,071 --> 00:22:44,611 कारण ते तुझे मित्र नाहीयत. 514 00:22:45,823 --> 00:22:47,373 आणि तुम्ही आहात? 515 00:22:47,450 --> 00:22:48,830 -नाही. -नाही. 516 00:22:50,036 --> 00:22:53,286 मी काय करू? मला ही मुलगी खरंच आवडली आहे. 517 00:22:53,372 --> 00:22:55,502 मला ती फक्त माझी पहिली म्हणून नकोय. 518 00:22:55,583 --> 00:22:57,423 ती माझ्यासाठी आणखीही बरंच काही आहे. 519 00:22:58,169 --> 00:22:59,919 सांग, काम करून करून हात मोडला. 520 00:23:00,004 --> 00:23:02,474 टोनी, हे फारच मूर्खपणाचं आहे. 521 00:23:03,299 --> 00:23:06,259 मला ही मुलगी आवडते. मला तिच्याशी खोटं बोलायचं नाहीय. 522 00:23:06,344 --> 00:23:09,474 अशा बाष्कळ गोष्टींवर तिचा कधीच विश्वास बसणार नाही. 523 00:23:10,223 --> 00:23:11,603 -बसेल? -नाही. 524 00:23:11,682 --> 00:23:13,392 आता सुचलं! 525 00:23:13,476 --> 00:23:15,596 तू बेसबॉलचा सराव करायला गेला होतास, ठीक? 526 00:23:15,686 --> 00:23:17,606 तिथे तुझा स्विंग आजमावत असताना 527 00:23:17,688 --> 00:23:19,068 तुझ्या हातात लचक भरली. 528 00:23:19,148 --> 00:23:21,028 तुझी हात मिळवण्याची पुरुषी शक्ती गेली. 529 00:23:21,109 --> 00:23:22,779 -विश्वसनीय वाटतंय. -चांगलं आहे. 530 00:23:22,860 --> 00:23:24,610 छे, फारच मूर्खपणाचं आहे. 531 00:23:24,695 --> 00:23:26,815 मी तिला खरं ते सांगणार आहे. 532 00:23:26,906 --> 00:23:28,316 मला जे जाणवतं ते. 533 00:23:31,035 --> 00:23:32,405 माझं खरं रूप दाखवणार. 534 00:23:40,878 --> 00:23:42,588 आणि जरी मी आता लीगचे सामने खेळत... 535 00:23:42,672 --> 00:23:44,552 प्लीज, आपण विषय बदलू या का? 536 00:23:44,632 --> 00:23:47,092 नक्कीच. तुला कशावर बोलायला आवडेल? 537 00:23:47,718 --> 00:23:49,388 मला माहीत नाही. 538 00:23:49,470 --> 00:23:52,470 तुझं हात मिळवणं किती नेभळट आहे, हे सोडून काहीही. 539 00:23:53,182 --> 00:23:54,602 माझं हात मिळवणं नेभळट आहे? 540 00:23:54,684 --> 00:23:58,154 तू तसं म्हणालास, आठवतं? 541 00:23:58,229 --> 00:24:00,819 तू गेली 20 मिनिटे त्याचं स्पष्टीकरण देतो आहेस. 542 00:24:01,274 --> 00:24:03,484 तर, तुला माझं हात मिळवणं नेभळट वाटत नाही? 543 00:24:03,568 --> 00:24:05,188 तू त्यामुळेच दाराकडे पळालीस 544 00:24:05,278 --> 00:24:06,858 याबद्दल माझी खात्री झाली होती. 545 00:24:07,780 --> 00:24:08,780 नाही. 546 00:24:09,657 --> 00:24:10,657 वा, छान. 547 00:24:11,868 --> 00:24:13,078 मग तू का पळालीस? 548 00:24:14,662 --> 00:24:17,082 खरं तर ते त्याचं आणि आपण चुंबन घेणार होतो 549 00:24:17,165 --> 00:24:21,165 तोच तू घुसमटलास याचं ते मिश्रण होतं. 550 00:24:22,503 --> 00:24:27,183 मग मी विचार केला, "त्याच्यात पुढाकार घेण्याची धमक नसली तर काय झालं?" 551 00:24:27,258 --> 00:24:30,138 नव्या जगात पुरुषाने प्रत्येक बाबतीत पहिलं पाऊल उचलणं म्हणजे 552 00:24:30,219 --> 00:24:32,429 आक्रमक किंवा शिकारी वृत्ती समजली जाते. 553 00:24:32,513 --> 00:24:34,313 धन्यवाद, हार्वे वाइनस्टिन. 554 00:24:34,390 --> 00:24:35,930 तो तद्दन मूर्खपणा आहे. 555 00:24:36,017 --> 00:24:37,887 पुरुषाने अधिक शक्तिशाली असणं गरजेचं का? 556 00:24:37,977 --> 00:24:39,977 तू आता उपदेशकासारखं बोलतेयस. 557 00:24:41,147 --> 00:24:42,397 तू फोन केलास, आनंद झाला. 558 00:24:43,482 --> 00:24:45,282 मी तुझ्याबद्दल खूप विचार करत होते. 559 00:24:46,152 --> 00:24:50,702 खरंच? मीही सतत तुझ्याबद्दल विचार करत होतो. 560 00:25:27,526 --> 00:25:30,396 बाप रे! तू इथे काय करतोयस? 561 00:25:30,488 --> 00:25:31,698 तू चॉकलेट केक कुठे लपवतोस 562 00:25:31,781 --> 00:25:34,201 ते शोधून काढण्यासाठी पहारा देतोय. 563 00:25:34,283 --> 00:25:35,283 यश मिळालं. 564 00:25:39,830 --> 00:25:41,670 पण तू त्या साठी जागा नाहीयस, खरं ना? 565 00:25:41,749 --> 00:25:45,289 हो... मला... झोप येत नाहीय. 566 00:25:45,920 --> 00:25:48,340 तुझा मित्र समीक्षकांबद्दल आणि अपयशाबद्दल जे बोलला 567 00:25:48,422 --> 00:25:50,052 ते सतत आठवतंय. 568 00:25:53,135 --> 00:25:54,425 कदाचित तो बरोबर बोलला. 569 00:25:57,932 --> 00:26:00,392 इथे तू काही तरी बोलणं अपेक्षित आहे. 570 00:26:03,437 --> 00:26:04,687 अर्धा केक हवाय? 571 00:26:06,941 --> 00:26:09,151 पण तो काही म्हणाल्याने तुला काय फरक पडतो? 572 00:26:09,235 --> 00:26:10,695 नाही पडत. 573 00:26:10,778 --> 00:26:12,148 अपवाद, ते खरं असेल तर. 574 00:26:13,531 --> 00:26:15,321 माहीत आहे, मी नवं पुस्तक सुरु केलंय. 575 00:26:15,408 --> 00:26:16,528 खरंच? 576 00:26:17,076 --> 00:26:20,286 ललित साहित्य की फक्त लोक आणि कामांची यादी? 577 00:26:20,371 --> 00:26:23,211 नाही. पुस्तक आहे. मी दोन महिन्यांपासून त्यावर काम करतोय. 578 00:26:24,292 --> 00:26:25,632 मला जबरदस्त पहिली ओळ सुचलीय. 579 00:26:27,837 --> 00:26:32,717 "जर तुम्ही पिऊन केलेल्या कार अपघातात पत्नी मरता मरता वाचली असेल, पुढे वाचा..." 580 00:26:34,427 --> 00:26:35,427 हे... 581 00:26:36,554 --> 00:26:37,814 जबरदस्त आहे. 582 00:26:38,264 --> 00:26:39,774 तू "जबरदस्त"च्या आधी थांबलास? 583 00:26:39,849 --> 00:26:41,809 नाही, तो केकचा ढेकर होता. 584 00:26:41,892 --> 00:26:43,192 मला ती खरंच जबरदस्त वाटली. 585 00:26:43,269 --> 00:26:47,109 पण तितकंच लिहू शकलोय. दुसऱ्या वाक्यापुढे जाताच येत नाहीय. 586 00:26:48,607 --> 00:26:49,607 ठाऊक आहे? 587 00:26:51,610 --> 00:26:55,030 जेव्हा मी समीक्षा लिहायचो तेव्हा सगळं वेगळं होतं. 588 00:26:55,114 --> 00:26:58,994 कारण कशावर तरी फक्त प्रतिक्रिया द्यायचो, 589 00:26:59,076 --> 00:27:01,036 ते चांगलं तरी असायचं किंवा कचरा तरी. 590 00:27:01,120 --> 00:27:03,500 त्या त्या गोष्टी आपोआप लिहिल्या जायच्या. 591 00:27:03,581 --> 00:27:06,171 पण इथे समजत नाहीय की मी कशाला प्रतिक्रिया देतोय, 592 00:27:06,250 --> 00:27:08,040 माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी येत आहेत 593 00:27:08,127 --> 00:27:10,667 आणि त्या सर्व कचरा आहेत. 594 00:27:10,755 --> 00:27:12,795 मला ते झटपट डिलीट पण करता येत नाही. 595 00:27:14,091 --> 00:27:15,971 तू ते काही काळ तसंच सोडून द्यायला हवं. 596 00:27:20,806 --> 00:27:24,476 ते तुला आवडणाऱ्या संगीतासारखं आहे. 597 00:27:24,560 --> 00:27:26,020 ते कलाकार काहीही खरडतात 598 00:27:26,103 --> 00:27:27,903 ते परिपूर्ण असतं, असतं थोडंच नाहीय. 599 00:27:27,980 --> 00:27:29,440 काही वेळेस ते कचरा लिहितात, 600 00:27:29,523 --> 00:27:31,363 मग त्याला सोडून नव्यावर काम सुरु होतं. 601 00:27:31,442 --> 00:27:34,032 त्या दरम्यान, त्या कचऱ्यात सुसंगती जाणवायला लागते, 602 00:27:34,111 --> 00:27:36,531 आणि ते नव्या कृतीवर काम करत असताना, 603 00:27:36,614 --> 00:27:39,664 त्या कचऱ्याचं आपोआप खत होऊन जातं. 604 00:27:39,742 --> 00:27:41,332 मग जुना आणि नवा कचरा मिळून 605 00:27:41,410 --> 00:27:43,910 लवकरच, कसं सांगू... महाकचरा तयार होतो, 606 00:27:43,996 --> 00:27:45,956 आणि हीच तर कला आहे, 607 00:27:46,040 --> 00:27:48,500 कचऱ्यावर तो कमी होईपर्यंत काम करत राहणे. 608 00:27:49,502 --> 00:27:50,592 कचरा. 609 00:27:54,131 --> 00:27:56,761 खरं आहे... खरं आहे... 610 00:27:56,842 --> 00:27:58,642 मला वाटतं तू बरोबर बोलतोयस... 611 00:27:59,303 --> 00:28:01,223 मी तसं अजिबात करत नाही. 612 00:28:01,305 --> 00:28:04,675 मी त्याकडे पाहतो आणि कागदावर उतरत असतानाच 613 00:28:04,767 --> 00:28:06,597 ते परिपूर्ण हवं असतं. 614 00:28:06,685 --> 00:28:08,095 डोक्यातून बाहेर काढायला हवं, 615 00:28:08,187 --> 00:28:10,437 आणि इतक्या गंभीरपणे घेणं सोडायला हवं. 616 00:28:10,981 --> 00:28:13,651 विचारलंस तर सांगेन, तू योग्य विचार करतोयस. 617 00:28:14,235 --> 00:28:18,945 पण तरीही, तू रात्रभर अंधारात तळमळत काढणं 618 00:28:19,031 --> 00:28:21,371 ही चांगली कल्पना आहे. 619 00:28:21,450 --> 00:28:22,450 मी लाइट बंद करतो. 620 00:28:23,577 --> 00:28:25,657 -शुभ रात्री. -शुभ रात्री. 621 00:29:14,712 --> 00:29:16,712 उपशीर्षक भाषांतरकार : अनिरुद्ध पोतदार